Tue, May 21, 2019 04:25होमपेज › Pune › बिटकॉईन सारखी शेकडो ‘कॉईन

बिटकॉईन’सारखी शेकडो ‘कॉईन

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:34AMपुणे :अमोल येलमार

बिटकॉईन’सारखी शेकडो ‘कॉईन’ मार्केटमध्ये आहेत. यातील शेकडो ‘कॉईन’मधील काही ‘कॉईन’चे ‘डायरेक्टर’ हे भारत, महाराष्ट्रासह पुणे शहरातील आहेत. इंटरनेटवरील या ‘कॉईन’च्या संकेतस्थळावर ‘सर्च’ केल्यास या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. यातील काही ‘कॉईन’ बोगस आहेत, तर काही फसवणुकीच्या उद्देशानेच तयार केल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. अनेक जणांनी स्वतः ‘बिटकॉईन’सारखी वेगवेगळ्या नावाने स्वतःची ‘कॉईन’ तयार केली असून, ती ‘साईट’वर विक्रीसाठी खुली केली आहेत. आभासी चलनात खरेदी-विक्री करणार्‍या उच्चशिक्षितांना याची पूर्णपणे माहिती असते. त्यामुळे हे लोक कोणत्या ‘कॉईन’मध्ये कधी आणि किती गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो याचे धडे देतात आणि नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात.

असे तयार होते चलन...

‘क्रिप्टो करन्सी’ आणि ‘ब्लॉक चेन’चा वापर करून ‘कॉईन’ तयार करून ती ठराविक कॉईन मार्केटमध्ये सोडली जातात. त्यानंतर या ‘कॉईन’चे ‘व्हेरिफिकेशन’ होते आणि ‘एक्सेंजर’द्वारे किंवा थेट पद्धतीने यामध्ये गुंतवणूक होते. बोगस ‘कॉईन’ तयार करणारे स्वतःची एखादी ‘वेबसाईट’ तयार करतात. त्यावर सर्व माहिती ‘अपलोड’ करून कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले जाते.