होमपेज › Pune › डिजिटल मीडिया समजण्यासाठी ‘भीमरूपी.. महारुद्रा’ व्याख्यान

डिजिटल मीडिया समजण्यासाठी ‘भीमरूपी.. महारुद्रा’ व्याख्यान

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:13AMपुणे : प्रतिनिधी

आजचे युग हे डिजिटल युग आहे. त्याप्रमाणे अनेक जण डिजिटल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सद्यःस्थिती पाहता ग्रामीण व शहरी भागात अजूनसुद्धा काहीजण डिजिटल मीडियाच्या वापरापासून वंचित आहेत; त्यामुळे सर्वांना डिजिटल मीडियाची कास धरून चालता यावे, यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात  आले आहे. स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्था यांच्या वतीने डिजिटल मीडियाचा वापर आणि डिजिटल पेमेंट प्रक्रिया नागरिकांना समजावी, याकरिता ‘भीम रूपी... महारुद्रा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार दि. 4 रोजी सायंकाळी 6 वाजता मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे होणार आहे. या व्याख्यानात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमासाठी दै. ‘पुढारी’ माध्यम प्रायोजक आहे. स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्‍वस्त संस्थेच्या वतीने सर्व नागरिकांनी उपस्थित राहून हे व्याख्यान श्रवणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व व्यवहार कॅशलेस व्हावेत, असा संकल्प जाहीर केला आहे व सरकारी पातळीवर विविध प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यानुसार ‘भीम अ‍ॅप’देखील सुरू  केले आहे. 

रोखीविना व्यवहार (कॅशलेस) ही संकल्पना घेतली तर देशाला व्यापक दृष्टीने फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपला सहभाग नोंदवावा. दै. ‘पुढारी’च्या वाचकांसाठी कार्यक्रमस्थळी राखीव जागा असणार आहेत; परंतु, 8805021575 या मोबाईल क्रमांकावर येणार्‍या वाचकांनी आपले नाव व सोबत येणार्‍या व्यक्तींची संख्या एसएमएस करावी. या नंबरवरून प्रवेशाचे कन्म्फर्मेशन मिळेल.