Tue, Jul 23, 2019 06:45होमपेज › Pune › शिवसृष्टीसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका  : पवार

शिवसृष्टीसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका  : पवार

Published On: Feb 12 2018 2:04AM | Last Updated: Feb 11 2018 11:49PMपुणे ः प्रतिनिधी

कोथरूड येथील जैववैविध्य आरक्षित जागेतवर (बीडीपी) होणार नियोजित शिवसृष्टीविरोधात जागरूक पुणेकर याविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या खासगी शिवसृष्टीला 300 कोटी रुपये दिले आहेत. शिवसृष्टीसंदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी असून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.  लाल महालात आयोजित केलेल्या बहुजन अस्मिता परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या पदाधिकार्‍यांची सह्याद्रीवर बैठक घेऊन कोथरूडमध्ये प्रस्तावित शिवसृष्टीसाठी बीडीपीची जागा सुचवली.

वास्तविक कोथरूडला मेट्रो स्थानक करून त्यावर शिवसृष्टी करणे शक्य होते. अनेक प्रगत देशात अशा प्रकारे मेट्रो स्थानकांवर मॉल्स, हॉटेल्स उभे करण्यात आले आहेत. मात्र, आता शिवसृष्टीला बीडीपीची जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे खासगी ट्रस्टकडून आंबेगावात उभारल्या जाणार्‍या शिवसृष्टीला 300 कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पुणेकरांची फसवणूक असून केवळ मेट्रोचे काम सुरू राहावे यासाठी काढलेली पळवाट आहे.   महापालिकेच्या शिवसृष्टीला बीडीपीची जागा देण्यात आली आहे. मात्र, बीडीपीत ठराविक कामांना मान्यता देणार आणि उर्वरित कामांना मान्यता देणार नाही, असे सरकार करू शकत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केली.