Tue, Feb 19, 2019 21:00होमपेज › Pune › पुण्यात ‘स्वाइन फ्लू’चे आठ रुग्ण

पुण्यात ‘स्वाइन फ्लू’चे आठ रुग्ण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे ; प्रतिनिधी

पुण्यात यावर्षी 415 रुग्ण संशयित, तर 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आठपैकी पाच रुग्ण उपचार घेऊन घरी गेले असून, दोन रुग्ण शहरात व्हेंटिलेटरवर आहेत. एकाचा जानेवारी महिन्यात पिंपरीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.  ‘स्वाइन फ्लू’चा व्हायरस हा शहरात सक्रिय आहे. शहरात जानेवारीपासून आतापर्यंत दोन लाख 10 हजार 663 रुग्णांची तपासणी (स्क्रीनिंग) केले आहे. त्यापैकी 3 हजार 139 रुग्णांना ‘टॅमिफ्लू’च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत, तर रुग्णांच्या लक्षणांवरून सध्या विविध रुग्णालयांत 360 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर त्यापैकी सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर पुणे ग्रामीण भागात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता.

त्याच्यावर जानेवारी महिन्यात पिंपरीमध्ये उपचार सुरू असताना तो दगावला. पुणे विभागात येणार्‍या सोलापूर जिल्ह्यात 3 हजार 972 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकही रुग्ण संशयित आढळला नाही, तर सातारा जिल्ह्यात पाच हजार 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता तेथे 31 रुग्ण संशयित आढळले होते. मात्र, या दोन्ही जिल्ह्यांत पॉझिटिव्ह एकही रुग्ण आढळलेला नाही. 
2017 मध्ये ‘स्वाइन फ्लू’चे मृत्यू : पुणे पालिका 53, पिंपरी-चिंचवड पालिका 47, पुणे ग्रामीण 62.
 


  •