Fri, Jan 18, 2019 07:46होमपेज › Pune › चांदणी चौक उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १८० कोटी

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी १८० कोटी

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 31 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी

चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपूलाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने 185 कोटींचा निधी देण्यास शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे भुमिपूजनही होऊन वर्षभर कागदावरच राहिलेल्या उड्डाणपूलाच्या कामाला आता सुरवात करता येऊ शकणार आहे.

गतवर्षी 27 ऑगस्टला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन झाले. मात्र, त्यानंतर वर्षभरात या पुलाच्या कामाची एक विटही रचली गेली नव्हती. या पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) करण्यात येणार असून त्यासाठी 450 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर पूलासाठी आवश्यक असलेल्या 14 हेक्तर जागेच्या भूसंपादनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. मात्र, वर्षभरात केवळ 6 हेक्टरच जागेचे भूसंपादन पालिकेला करता आले आहे. जागा मालक रोख मोबदल्याची मागणी करत असल्याने हे काम रखडले आहे. त्यावर महापालिकेने भूसंपादनासाठी शासनाकडे 185 कोटींची मागणी केली होती. केंद्रिय मंत्री गडकरी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा निधी देण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने गत आठवड्यात सुधारीत प्रस्ताव पाठविला होता. त्यावर गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी मंज़ुरीचा शिक्का मोर्तब केला. 

नगरविकास खात्याने एकूण मागणीच्या 50 % निधी द्यावा असा प्रस्ताव  मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र पालिकेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी 100 निधी मंजुर केला आहे. त्यामुळे आता भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लागणार असून पुलाच्या कामालाही सुरवात होऊ शकणार आहे.