Wed, Sep 19, 2018 16:59



होमपेज › Pune › ऊस दर नियंत्रण मंडळावर १३ सदस्य

ऊस दर नियंत्रण मंडळावर १३ सदस्य

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 31 2018 1:40AM



पुणे  प्रतिनिधी

ऊस दर नियंत्रण मंडळाची समिती स्थापन करण्यात आली असून शेतकर्‍यांचे 5 प्रतिनिधी, सहकारी साखर कारखाने 2 व खासगी 2 आणि विशेषत निमंत्रितपदी 4 शेतकरी प्रतिनिधी मिळून एकूण 13 सदस्यांची नियुक्ती सहकार व पणन विभागाने केलेली आहे. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि साखर आयुक्तांच्या सदस्य सचिवांच्या उपस्थितीत 15 सदस्यीय समितीचे कामकाज लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. 

ऊस दर नियंत्रण मंडळाच्या पहिल्या समितीची मुदत संपल्याने हंगाम 2017-18 मधील उसाच्या अंतिम दराची निश्‍चिती रखडल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेेले होते. 1 ऑक्टोंबरपासून 2018-19 चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार असताना गतवर्षीच्याच उसाचे अंतिम दर रखडल्यामुळे हा विषय चर्चेचा झाला होता. 

राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस दराचे विनियमन 2013 आणि नियम 2016 या कायद्यान्वये समिती स्थापन करण्याचे आदेश सहकार विभागाचे उपसचिव दि. शि. देसाई यांनी जारी केलेले आहेत. त्या समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे. शेतकरी प्रतिनिधी ः शिवानंद नागनाथ दरेकर (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर), प्रल्हाद रामजी इंगोले (मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड), पांडुरंग बळवंत थोरात (आमदाबाद, ता. शिरुर, जि.पुणे), विठ्ठल नामदेव पवार (केशवनगर-मुंढवा, पुणे), भानुदास सुरेश शिंदे (कानगांव, ता. दौंड, जि.पुणे). 

सहकारी साखर कारखाना प्रतिनिधी ः श्रीराम शेटे (कादवा सहकारी, मातेरेवाडी, ता. दिंडोरी, जि.नाशिक), धर्मराज काडादी (सिद्धेश्‍वर सहकारी, कुमठे, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर). खाजगी साखर कारखाना प्रतिनिधी ः डॉ. तानाजी सावंत (चेअरमन, भैरवनाथ शुगर, मुगांव, ता. परांडा, जि.उस्मानाबाद), नितीन कृष्णकांत मुधोळकर (चेअरमन मानस अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड, जि. नागपूर). मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 4 शेतकरी प्रतिनिधींची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ती नावे पुढीलप्रमाणे ः खासदार संजय पाटील (तासगाव, जि. सांगली), वैभव नाईकवडी (जि. सांगली), महमूद पटेल (कुरगुट दक्षिण सोलापूर), कृषिभूषण शेतकरी संजीव माने (आष्टा, ता. वाळवा, जि.सांगली).