होमपेज › Pune › ससूनमध्ये गेल्यावर्षी  11 रुग्ण झाले ब्रेन डेड 

ससूनमध्ये गेल्यावर्षी  11 रुग्ण झाले ब्रेन डेड 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

अवयव प्रत्यारोपणासाठीची ब्रेन डेड रुग्णांची आवशकता असते. ससूनला अवयव काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर येथे ब्रेन डेड रुग्णांची नोंद ठेवण्यात येत आहे. या रुग्णालयात गेल्यावर्षी 11 रुग्णांना ब्रेन डेड रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 6 रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानास परवानगी दिल्याने इतर रुग्णांवर अवयव प्रत्यारोपण करणे शक्य झाले.  ससूनमध्ये दाखल होणारे बरेच रुग्ण अपघातातील असतात. यामुळे येथे ब्रेन डेड होणार्‍या रुग्णांची संख्यादेखील जास्त आहे. सध्या येथे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात येते. तर यकृत प्रत्यारोपणाची परवानगी नुकतीच मिळाली आहे. यापूर्वी येथे तीन रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

ब्रेन डेड रुग्ण म्हणजे त्या रुग्णाचा मेंदू हा मृत झालेला असतो, पण त्याचे इतर अवयव जसे हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस हे व्यवस्थित कार्य करते. पण हा रुग्ण व्यक्‍ती कधीही बरा होऊ शकत नाही. म्हणून अशा निरोगी रुग्णाचे अवयव इतर रुग्णांसाठी प्रत्यारोपित करण्यास उपयुक्‍त ठरतात. खासगी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाचा खर्च प्रचंड असतो. हा खर्च ससूनपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. तो गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा रुग्णांना ससून हे आशेचा किरण ठरत आहे. यापैकी गरीब रुग्णांना प्रत्यारोपणासाठी येथील वैद्यकीय समाजसेवा विभागही आर्थिक मदत करतो. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाले आहे.
 


  •