Mon, Apr 22, 2019 01:44होमपेज › Pune › १०० टक्के शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांना शासनाचा दणका 

१०० टक्के शुल्क घेणार्‍या महाविद्यालयांना शासनाचा दणका 

Published On: Sep 08 2018 5:42PM | Last Updated: Sep 08 2018 5:42PMपुणे : प्रतिनिधी 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमासांठी प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकडून केवळ ५० टक्के शुल्क घेण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यान, त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारण्याचा सपाटा लावला होता. शासनाने गुरुवारी परिपत्रक काढत महाविद्यालयांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क परत करण्याचे आदेश देत महाविद्यालयांना चांगलाच दणका दिला आहे. 

राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चानंतर राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक ६०५ अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी केवळ ५० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५० टक्के रक्कम भरून महाविद्याालयांत प्रवेश देण्याचा आदेश दिला. तशा सुचना विद्यापीठ, तंत्र शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालयांमार्फत राज्यातील महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारणे सुरुच ठेवले होते. याविरोधात विद्यार्थी पालकांनी उच्च शिक्षण विभागाकडे अनेकदा तक्रार दाखल केली होती. 

विद्यार्थ्यांकडून ज्यादा शुल्क आकारुन आदेशाची पायमल्ली करणार्‍या ११ महाविद्यालयांवर कारवाई करत उच्च शिक्षण विभागाने शुल्क पर देण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले होते. मात्र, त्यानंतरही महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची आकारणी सुरुच होती. दरम्यान, शासनाने शुक्रवारी १०० टक्के शुल्क आकारणार्‍या महाविद्यालयांना दणका देत ५० टक्के शुल्क परत करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा आर्थिक दुर्लब घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर महिन्यात जमा करण्यात येणार आहे.