Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Pune › पुण्यात बड्या पब, हुक्‍का पार्लवर बेधडक कारवाई

पुण्यात बड्या पब, हुक्‍का पार्लवर बेधडक कारवाई

Published On: Aug 12 2018 10:57AM | Last Updated: Aug 12 2018 10:56AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील तरुणाईत प्रसिध्द तसेच नामांकित पब आणि हुक्का पार्लवर व हॉटेल्सवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री बेधडक कारवाई केली. धक्कादायक म्हणजे, बारा हॉटेलमधील कारवाईत पोलिसांनी ६ ते ७ हजार तरुण-तरुणी मिळून आल्या आहेत. कोंढवा, कोरेगाव पार्क आणि चतरुशृंगी भागातील हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शहर पोलिस दलासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

शहरात लॉटरी, मटक्या अवैध्ये धंदे सध्या जोमात सुरू आहेत. त्यामुळे नवनियुक्त डॉ. वेंकटेशम यांनी तत्काळ यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, आर्थिक व सायबर शाखेच्या ज्योतिप्रिय सिंग सहायक आयुक्य भानुप्रताप बर्गे व निलेश मोरे आणि त्यांच्या ७० कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली आहे.