Thu, Mar 21, 2019 00:56होमपेज › Pune › सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेचराला पुणेरी पगडी घालून निषेध!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेचराला पुणेरी पगडी घालून निषेध!

Published On: Jan 11 2019 5:09PM | Last Updated: Jan 11 2019 5:39PM
पुणे : पुढारी ऑनलाईन 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११४ व्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी विद्यापीठाने पोशाख बदलल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे पाटील आणि कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करताना खेचराला पुणेरी पगडी घालुन पुणेरी पगडीचा निषेध व्यक्त केला.  

विद्यापीठाच्या बदललेल्या पदवी प्रदान पोशाखामध्ये असणाऱ्या पुणेरी पगडीवरून काही विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला. त्यामुळे पदवी प्रदान सोहळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे काही विद्यार्थ्यांनी सोहळ्यात पुणेरी पगडीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तर दुसरीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे पाटील आणि कार्यकर्त्यांनी खेचराला पुणेरी पगडी घालुन पुणेरी पगडीचा निषेध व्यक्त केला.