होमपेज › Pune › उच्चभ्रू वेशाव्यवसायाचा पर्दाफाश; चौघींची सुटका

उच्चभ्रू वेशाव्यवसायाचा पर्दाफाश; चौघींची सुटका

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, मुंबई व दिल्ली येथील चार मुलींची सुटका केली आहे. दुसर्‍या कारवाईत मोक्कामधील  फरार आरोपीला अटक करत उझबेकिस्तान या देशातील तरुणीची सुटका करण्यात आली आहे. 

युवराज केशव थापा (वय 27, रा. वडगाव शेरी, मूळ नेपाळ) व यिमना ऊर्फ निशा मिलंबा जमेर (वय 23, रा. नागालँड), तसेच राहुल ऊर्फ अतीश चंद्रकिशोर शर्मा (वय 35, रा. लँडमार्क सोसायटी, उंड्री) व विशाल ऊर्फ तेजबहाद्दूर धनबहादूर छेत्री (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

कर्मचारी सतीश ढोले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली.  तर   दुसर्‍या कारवाईत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यातील (मोक्का) फरार आरोपी युवराज थापा   व यिमना ऊर्फ निशा जमेर दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीवरून  नगर रस्त्यावरील हॉटेलमधून  उझबेकिस्तान देशातील तरुणीची सुटका केली. दरम्यान थापा याच्यावर पिटा कायद्यानुसार मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, तो या गुन्ह्यांमध्ये फरार होता.  

ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, सतीश ढोले, नितीन तेलंगे, गीतांजली जाधव, कविता नलावडे, राजेंद्र कचरे, राजाराम घोगरे यांच्या पथकाने केली आहे.