Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Pune › मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन : पृथ्वीराज चव्हाण

मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन असून, खरोखरच आरक्षण द्यायचे की नाही, आरक्षण कसे देणार याबाबतही संभ्रम आहे. आरक्षण देण्यात हे सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते टिळक स्मारक येथील आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करता येणार नाही, असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने 2008 मध्ये दिला होता; मात्र आयोगाचा विरोध धुडकावून त्या वेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात 16 व मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तसा अध्यादेशही काढला होता. त्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले असताना त्यावर न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. याबाबत चव्हाण म्हणाले, आता सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मराठा आरक्षणाच्या विधेयकामध्ये बदल करणे गरजेचे होते. पण बदल न करता या सरकारने आघाडी शासनाचेच विधेयक जसेच्या तसे मंजूर केले. त्यामुळे ते न्यायालयात टिकले नाही. म्हणजे हे सरकार आरक्षणाबाबत जी भूमिका घेत आहे, ती भूमिका निश्‍चितच निरागस नाही. 

या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, या भाजपचे धोरण हे एका क्षणात सर्व देश हिंदू बनविण्याचे आहे. पण, ते होऊ शकत नाही. कारण हा देश धर्मनिरपेक्ष आहे; तसेच आसामात शासनाने जे रोहिंग्यांचे सर्वेक्षण केले आणि तो आकडा 40 लाख असल्याचे जाहीर केले तो थातुरमातूर आहे.