Mon, Jul 13, 2020 02:10होमपेज › Pune › पुणे : कैद्याचा पलायनाचा प्रयत्न

पुणे : कैद्याचा पलायनाचा प्रयत्न

Last Updated: May 25 2020 4:30PM

संग्रहित छायाचित्रपुणे : पुढारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून कैद्याने पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळासाहेब गोविंद कांबळे (वय.५०) असे पलायनाचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी कांबळेच्या विरुद्ध येरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, येरवडा कारागृहातील पोलिस शिपाई भगवान माणिक पालवे (वय.५१) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तात्पुरते कारागृह मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकिय वसतीगृह प्रेस कॉलनी समोर येरवडा येथे घडला आहे.

वाचा :बारामती तालुक्यात आणखी एक कोरोनाग्रस्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळता यावा म्हणून कारागृह प्रशासनाने शहरात तात्पुरत्या स्वरुपाची कारागृहे तयार केली आहेत. त्यानुसार आरोपी कांबळे याला प्रेस कॉलनी समोरील शासकीय वसतीगृहात तयार केलेल्या तात्पुत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने कारागृहातील खोली क्रमांक तीनचा प्लायवूडचा दरवाजा त्याने जोरात हिसका देऊन उघडला. त्यानंतर खोलीतून बाहेर पडून लोखंडी रेलिंगला खाली उडी मारून कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच बंदोबस्तावर असेल्या पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याला पकडले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

वाचा : गडद संकटाची चाहुल; राज्य सरकारने थेट केरळमधून डॉक्टर, परिचारिका मागवल्या!