होमपेज › Pune › पुणे : येरवडा मनोरूग्णालयात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या 

पुणे : येरवडा मनोरूग्णालयात कैद्याची आत्महत्या 

Last Updated: Jan 21 2020 12:55PM
पुणे : प्रतिनिधी 

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या कैद्याने सोमवारी रात्री रूग्णालयातील एका खोलीत गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

सुनील विजयसिंह प्रजापती (मूळ रा. मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. प्रजापती हा खुनाच्या गुन्ह्यातील कैदी होता. त्याला कुरूडवाडी येथून मानसिक उपचारासाठी १ जानेवारी रोजी येरवडा येथील प्रादेशिक मनोरूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी तो जेव्हा त्याच्या खोलीत होता तेव्हा खोलीमध्ये बंद असताना त्याने त्याच्याजवळ असलेली चादर फाडली आणि खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

वाचा- कोल्हापूर : अश्लिल चाळे करणाऱ्या तीन जोडप्यांना पकडले