Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Pune › एनडीए नियुक्तीत अनियमितता; प्राचार्य, प्राध्यापकांवर गुन्हा 

एनडीए नियुक्तीत अनियमितता; प्राचार्य, प्राध्यापकांवर गुन्हा 

Published On: Jun 06 2018 4:08PM | Last Updated: Jun 06 2018 4:07PMपुणे : प्रतिनिधी 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील(एनडीए) अध्यापन फॅकल्टीच्या विविध पदांच्या नियुक्तीतील अनियमितता प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  प्राचार्य, प्राध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी या सर्वांच्या एनडीएतील कार्यालये व घरांची झडती घेण्यात आली. 

याप्रकरणी सीबीआयने एनडीएचे प्राचार्य दोन सहायक प्राध्यापक, एक प्राध्यापक, रसायनशास्त्र विषयाचे विभागप्रमुख (एचओडी) आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

खोटे दस्तावेज देऊन एनडीएमध्ये विविध पदांकरता नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाकडून बुधवारी प्राचार्य व गुन्हा दाखल झालेले प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांच्या कार्यालय व घरांची झडती घेतली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.