Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Pune › अक्कलकोट संस्थानच्या राजकुमारी संयुक्ताराजे भोसले यांचे निधन

अक्कलकोट संस्थानच्या राजकुमारी संयुक्ताराजे भोसले यांचे निधन

Published On: May 05 2018 6:45PM | Last Updated: May 05 2018 6:45PMअक्कलकोट : प्रतिनीधी

श्रीमंत मालोजीराजे यांच्या राज्यरोहणानंतर श्रीमंत राजकुमारी संयुक्ताराजे भोसले यांच्यावर शोकाकूल वातावरणात राजेशाही पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे प्रथम मोलोजीराजे भोसले यांना विधिवत मंञघोषात गादीवर बसविण्यात आले. एका छोटेखानी समारंभात राज्यारोहणाचा विधी पार पडला.

श्रीमंत राजकुमारी सुनीताराजे भोसले यांनी मानकरी मंडळी आणि राजघराण्यातील सदस्‍य यांच्या साक्षीने स्वहस्ते अक्कलकोट संस्थान गादीवर रितसर मालोजीराजे यांना बसविले. या वेळी उपस्थितांनी कुंकुमार्चन मंगलअक्षता आणि पूप्षवृष्टी केली. यावेळी वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे फत्तेसिंह शिक्षणसंस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, तात्यासाहेब घाटगे, विलासराव जाधव, अरविंद घाटगे, विश्वासराव निंबाळकर, राजसिंह राजेशिर्के, तानाजी बावणे, विजय जगताप, पांडूरंग काटकर, गुणवंत बागुल, अॅड. रविंद्र खैराटकर, शशिकांत लिंबीतोटे, आदी उपस्थित होते. राज्यरोहणानंतर मानकरी मंडळीनी नूतन राजाचे अभिष्टचिंतन केले. तर अश्विनी निंबाळकर आणि वैजयंती निंबाळकर यांनी राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे मालोजीराजे यांचे औक्षणव केले. सांयकाळी पाच वाजता नवाराजवाडा येथून  संयुक्ताराजे भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होती.

आमदार सिध्दाराम म्हैञे, अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, खासदार अमर साबळे, माजी मंञी लक्ष्मण ढोबळे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ लांडगे, मुस्लीम समाज अध्यक्ष एजाज मुतवल्री, माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, लायन्स क्लब अध्यक्ष महेश हिंडोळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, शरणमठाचे मठाधीश शिवशरण रेवणसिध्द, महास्वामी जेष्ठ नेते गफूर शेरिकर, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांच्यासह विविध पक्ष संघटना यांनी अंत्यदर्शन घेवून श्रध्दांजली अर्पण केली. शहराच्या प्रमुख मार्गावरून अंत्ययाञा निघाली प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला.  आनंदबाग (थडगेमळा) येथे संयुक्ताराजे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.