Mon, Aug 19, 2019 11:55होमपेज › Pune › ...अन्‌ पुणे जि. प. प्राथमिक शिक्षण विभागास ठोकले टाळे

...अन्‌ पुणे जि. प. प्राथमिक शिक्षण विभागास ठोकले टाळे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

 शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत बिलाची अनुदान रक्कम अदा करण्यासाठी अधीक्षक शिल्पा मेनन आणि लिपिक महादेव सारूख यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यांच्या चौकशी दरम्यान प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे मेनन यांनी कबुली जबाबात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांचा पदभार काढून घ्यावा. या मागणीसाठी शिवसेना गटनेता आशा बुचके आणि काँग्रेस गटनेते विठ्ठल आवाळे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला टाळे ठोकले.

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात मागील अनेक दिवसांपासून विविध कामांसाठी पैसे स्वीकारले जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. अशी माहिती आशा बुचके यांनी विभागाला टाळे ठोकल्यानंतर दिली आहे. त्यातच पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नसल्याने प्रशासनात अनागोंदी कारभार माजला आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक शिल्पा  मेनन आणि लिपिक महादेव सारूख यांना ५० हजारांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची बदनामी झाली आहे. तसेच आरोपींच्या चौकशी दरम्यान प्राथमिक शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांच्या सूचनेनुसार लाच स्वीकारली असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे यामध्ये जिल्हा परिषदेच्या कारभारावर नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे .त्यामुळे जोपर्यंत दराडे यांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी बुचके यांनी केली आहे. आंदोलनात विठ्ठल आवाळे सहभागी झाले होते.


  •