होमपेज › Pune › पोत्यात बांधलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात यश

पोत्यात बांधलेल्या त्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात यश

Published On: Jun 04 2018 10:09AM | Last Updated: Jun 04 2018 10:09AMपुणे : प्रतिनिधी

मुळा-मुठा नदी पात्रात पूना हॉस्पिटल परिसरात पोत्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. देहविक्री करणारी महिला असून, वेश्यागमनासाठी आल्यानंतर झालेल्या वादातून तिचा खून करण्यात आला असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मिरा उर्फ सिमा संजय वाघचौरे (वय-४० अंदाजे, रा. भीमनगर, दौड)  पुणे रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यावसाय करत होती. त्यातून तिची ओळख आबिद इमरान खान (वय-२२,रा. कोंडवा), आणि मोहम्मद शहाबाद अब्दुलहमिद खान (वय-२३, रा.कोंडवा) या दोघांशी झाली होती. त्यांनी दहा दिवसांपूर्वी दोघांनी तिला भेटण्यासाठी बोलावले होते. परंतु त्यांच्यात पैशाच्या कारणावरुन वाद झोले.  त्यानंतर त्यांनी गळा आवळून ठार मारले. त्यानंतर हात-पाय बांधून मृतदेहाचे पोत्यात घातला. तसेच, दुचाकीवरून तो नदीपात्रात आणून टाकला. 

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एकने केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.