Wed, Sep 26, 2018 16:36होमपेज › Pune › पुण्यात पोलिस पाटलाच्या पत्नीची हत्‍या 

पुण्यात पोलिस पाटलाच्या पत्नीची हत्‍या 

Published On: Jun 27 2018 12:44PM | Last Updated: Jun 27 2018 12:44PMखोडद : प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील साकोरी (ता.जुन्नर) गावचे पोलिस पाटील देविदास साळवे यांच्या पत्नीची हत्‍या करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. संगीता देविदास साळवे असे हत्‍या झालेल्‍या महिलेचे नाव आहे. संगीता यांच्यावरी तलवारीने वार करून त्‍यांची हत्‍या करण्यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. 

या घटनेशी सबंधीत असणारे शिवाजी साळवे यांनी विष पिल्याचे पिऊन आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केला आहे. घटनेनंतर शिवाजी साळवे यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून, या घटनेचा तपास करत आहेत.