Sun, Jul 05, 2020 22:30होमपेज › Pune › पुणे : पॅरोल रजेवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी!

पुणे : पॅरोल रजेवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी!

Last Updated: May 30 2020 11:11AM

आरोपी पोलिस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी, पोलिसांनी हस्तगत केलेला एक गावठी कट्टा, काडतूसे आणि मोटारपुणे : पुढारी वृत्तसेवा

येरवडा कारागृहातून पॅरोल रजेवर सुटलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या स्वागत रॅलीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा एक पोलिस कर्मचारीच सहभागी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जणांना शुक्रवारी रात्री  बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून चार अलिशान मोटारी, एक गावठी कट्टा, काडतूसे असा तब्बल ३३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार ः उपमुख्यमंत्री

पोलिस कर्मचारी शरीफ बबन मुलाणी (वय ३६ रा. इंद्रायणीनगर भोसरी), आझाद शेखलाल मुलाणी (वय ३० रा. तळवडे चिखली) आदेश दिलीप ओकाडे (वय २१ रा. सुयोग नगर, निगडी) मुबारक बबन मुलाणी (वय ३८ रा. मोरेवस्ती चिखली) संदीप किसन गरुड (वय ४० रा. तळेगाव दाभाडे) हुसेन जाफर मुलाणी (वय ४३) सिराज राजू मुलाणी (वय २२) विनोद नारायण माने (वय २६ तिघेही रा. कोळवण मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्या विरोधात आर्म अॅक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यंदा आषाढी वारी पायी नाही; पण, माऊलींच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार (video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री  खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली. ते सुटणार यासाठी त्याचे भाऊ, नातेवाईक मित्र पिंपरी चिंचवड, मुळशी, भोसरी, चिखली परिसरातून येरवडा जेल परिसरात एकत्र आले होते. दरम्यान आरोपी हे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर २० ते २५ नातेवाईक व समर्थ दुचाकी व चारचाकी वाहनांतून रस्त्याने आरडाओरडा करत निघाले होते. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या समोरुन जात असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना आरटीओ चौक फुलेनगर याठिकाणी त्यातील एक चारचाकी गाडी अडवली. इतर समर्थकांना देखील गाड्यांसह थांबण्यास सांगितले. यावेळी पोलिसांनी चारचाकी गाडीतून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व लोखंडी बार अशी घातक शस्त्रे जप्त केली.

सात-बारा होणार अधिक सोपा

दरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातून आरोपींची पॅरोलवर सुटका करण्यात येते आहे. त्यामुळे त्यांना घेण्यासाठी येणारे समर्थक नातेवाईक यांची मोठी गर्दी जेल परिसरात होते आहे. रॅली काढण्यात आलेला हा काही पहिलाच प्रकार आहे असे नाही, यापुर्वी देखील सराईतांच्या मिरवणूका काढल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्याची गरज आहे.