Tue, Nov 13, 2018 10:22



होमपेज › Pune › DSK प्रकरणी नित्यानंद देशपांडेना 27 पर्यंत पोलीस कोठडी

DSK प्रकरणी नित्यानंद देशपांडेना 27 पर्यंत पोलीस कोठडी

Published On: Jun 21 2018 4:28PM | Last Updated: Jun 21 2018 4:28PM



पुणे : प्रतिनिधी

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी डीएसके अटकेत आहेत. त्यांच्या कंपनीला गैरमार्गाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक नित्यानंद सदाशिव देशपांडे यांना अटक केली. त्यांनतर प्रवासी कोठडीद्वारे न्यायालयात हजर केले. त्यांना विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी 27 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

बँकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशिल मुहनोत यांना अहमदाबाद अटक करण्यात आली परंतु त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले नाही. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभाकर मराठे, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार वेदप्रकाश गुप्ता, डीएस कुलकर्णी डेव्हलपर्सचे सनदी लेखापाल सुनिल मधुकर घाटपांडे आणि डीएस कुलकर्णी डेव्हलपर्सचे मुख्य अभियंता तसेच उपाध्यक्ष राजीव दुल्लभदास नेवासकर या चौघांना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनाविन्यात आली आहे.

यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी युक्तीवाद केला. तर बचाव पक्षाच्या वतीने ऍड. सचिन ठोंबरे यांनी विरोध केला.