होमपेज › Pune › पुण्यात वाहतूक पोलिसाची मारहाण 'व्हायरल' 

पुण्यात वाहतूक पोलिसाकडून टेम्‍पो चालकाची 'धुलाई'(Video)

Published On: Feb 04 2018 6:38PM | Last Updated: Feb 04 2018 6:38PMवाकड : वार्ताहर 

वाहतूक पोलिसाने एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वाकड येथील भूमकर चौकात शनिवार (दि.३) सायंकाळी ५ च्या सुमारास हा प्रकार घडला होता. एका पादचाऱ्याने ही मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केली. 

या व्हिडीओमध्ये हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार डावरे एका चालकास मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होऊ लागली आहे.  याबाबत वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की त्या टेम्पो चालकाने सांगूनही टेम्पो दामटला. त्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्याने त्यास मारहाण केल्याचे दिसते. परंतु त्या चालकावर  कुठलाही गुन्हा नोंद केला नसल्याचेही त्यांनी पुढरीशी बोलताना सांगितले.