Wed, Apr 24, 2019 00:19होमपेज › Pune › पुणे : लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

पुणे : लाच घेताना पोलिसाला रंगेहाथ पकडले

Published On: Feb 03 2018 4:17PM | Last Updated: Feb 03 2018 4:17PMपुणे : प्रतिनिधी

बारामती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकांने रंगेहात पकडले. तक्रारी अर्जावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. तात्यासाहेब खाडे (32) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.