Mon, Jun 17, 2019 02:49होमपेज › Pune › बोकड, कोंबडी चोर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान 

बोकड, कोंबडी चोर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान 

Published On: Feb 23 2018 8:16PM | Last Updated: Feb 23 2018 8:19PMयवतः वार्ताहर

खामगाव येथील शेतकरी सतीश बबन नागवडे यांच्या गोठ्यातील ५०० रुपये किंमतीच्या दोन कोंबड्या, ५ हजार रुपये किंमतीचा एक बोकड आणि ३ हजार रुपये किंमतीची एक शेळी चोरीला गेल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी घडल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे यवत पोलिसांच्या समोर आता 'कोंबडी' चोर शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार मोहिते यांच्यावर सोपविण्यात आला असून त्यांच्यावर कोंबडी चोर शोधण्याचे अवघड काम आहे. 

एखादी वस्तू चोरी झाल्यानंतर ती शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करते परंतू, आता कोंबडी चोरी सारख्या घटना देखील पोलिसांना शोधून द्याव्या लागत असल्याने पोलिसांची जबाबदारी वाढली आहे.  

पोलिसांना काम करताना राजकीय दबाव, मोठे गुन्हेगार शोधणे  या सारखी आव्हाने असताना, आता कोंबडी चोर शोधणे यासारखी कामे करावी लागणे म्हणजे एक प्रकारे हास्यास्पद प्रकार देखील आहे. तसेच यापूर्वी देखील याच भागात एक शेळी चोरीला गेल्याची फिर्याद यवत पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता अट्टल शेळी चोर करणारी टोळी तर या भागात सक्रिय नाही ना हे देखील पोलिसांना पाहावे लागणार आहे.