Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Pune › पुणे :पीएमपीएल बस आगीत भस्मात

पुणे :पीएमपीएल बस आगीत भस्मात

Published On: Jan 27 2018 10:25AM | Last Updated: Jan 27 2018 10:25AMपुणे : प्रतिनिधी

हडपसर गाडीतळ येथे उभा केलेल्या पीएमपी बसला भीषण आग लागली. या आगीत बस भस्मात पडली आहे. दरम्यान ही बस सीएनजी गॅसची होती. अग्निशामक दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. आज सकाळी हा प्रकार सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. आगीचे कारण समजू शकले नाही.