Tue, Nov 13, 2018 23:53होमपेज › Pune › देहूरोड येथे ब्रेकफेल पीएमपीचा थरार 

देहूरोड येथे ब्रेकफेल पीएमपीचा थरार 

Published On: Apr 05 2018 1:44PM | Last Updated: Apr 05 2018 1:44PMदेहूरोड : वार्ताहर

पीएमपीचा ब्रेकफेल झाल्यामुळे झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले आहेत. निगडीहून वडगावकडे निघालेल्या पीएमपीचा ब्रेकफेल झाल्यामुळे पुढे चाललेल्या तीन दुचाकी आणि एका इनोव्हा मोटारीला पीएमपीची धडक बसली. 

चार वाहनांना धडकून बस पुढे पुलाच्या कठड्याला घासत जाऊन बस थांबली. या अपघातात तीनही दुचाकीचालक जखमीअसून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (दि.५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सवाना चौकाजवळ हा थरार घडला.