Mon, Mar 25, 2019 03:10
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

Published On: Apr 26 2018 6:25PM | Last Updated: Apr 26 2018 6:25PMपिंपरी : प्रतिनिधी 

भोसरी सहल केंद्रातील जलतरण तालावात बुडून एका २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज गुरुवार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. सनी बाळासाहेब ढगे (वय २२, रा. भोसरी) असे तलावात बुडालेल्‍या तरूणाचे नाव आहे. 

भोसरी सहलकेंद्रात महापालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावात दुपारी साडेतीनच्या सुमारास सनी पोहण्यासाठी आला असता तो बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सनी याचा मृतदेह सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर भोसरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.