Mon, Jul 13, 2020 11:29होमपेज › Pune › 'राष्ट्रवादीची बदनामी करुन भाजपने सत्ता मिळवल्याचे सिद्ध' 

'राष्ट्रवादीची बदनामी करुन भाजपने सत्ता मिळवल्याचे सिद्ध' 

Published On: Dec 30 2017 12:30PM | Last Updated: Dec 30 2017 12:30PM

बुकमार्क करा
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची टीका

पिंपरी : प्रतिनिधी

आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणार्‍या विठ्ठल - रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला असल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मूर्ती खरेदीत कोणतीच चूक केली नाही, भाजपने केवळ राष्ट्रवादीला बदनाम करून सत्ता मिळवल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला आहे. याप्रकरणात आरोप करण्यात आलेले सहआयुक्त दिलीप गावडे यांना महापालिका आयुक्तांनी दोषमुक्त करत सक्त समज दिली आहे. तर भांडार अधिकारी सुरेश लांडगे यांना ५०० रूपये दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर दोघांची खातेनिहाय चौकशीही रद्द केली आहे. याबाबत वाघेरे यांनी म्हटले आहे की, कोणतेही पुरावे न देता निवडणुकीसाठी भाजपने मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा स्टंट केला होता. अखेर सत्य जनतेसमोर आले आहे. डोंगर पोखरून उंदीर निघाला आहे. मात्र, खोटे बोलून भाजपने सत्ता संपादन केली. काही सुपारी घेतलेले त्यांचे पंटर लोक त्यास जबाबदार आहेत, असा आरोप वाघेरे यांनी केला

स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा याचे भाजपने प्रचारात भांडवल केले. पण, त्यात विरोधक दोषी नसल्याचे सिद्ध झाले याउलट भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर काय काय केले, ते जनता पाहत आहे, असेही वाघेरे म्‍हणाले.