Sat, Apr 20, 2019 10:27होमपेज › Pune › 'सामाजिक,आर्थिक सुधारणांसाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा'

'सामाजिक,आर्थिक सुधारणांसाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा'

Published On: Jan 10 2018 4:21PM | Last Updated: Jan 10 2018 4:21PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर जाऊन लढणे म्हणजेच देशभक्ती नव्हे ,ती उच्च प्रतीची राष्ट्रभक्ती आहे मात्र राष्ट्र बांधणीत सहभाग, राष्ट्र पुढे नेण्यासाठी पुढाकार घेणे हीसुद्धा राष्ट्रभक्ती आहे .म्हणूनच सामाजिक व आर्थिक सुधारणांसाठी खासगी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा’,असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

सिंबॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या किवळे येथील सिम्बायसीस स्किल सेन्टरचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले .त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर नितीन काळजे, सिंबॉयसिससचे संस्थापक व अध्यक्ष डॉ शांब .मुजुमदार ,सिंबॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या प्रो चॅनसी लर डॉ स्वाती मुजुमदार ,श्रावण कवडेकर आदी उपस्थित होते

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ,पारंपरिक खासगी विद्यापीठापेक्षा कौशल्य विद्यापीठ हा वेगळा प्रयोग आहे कौशल्य विद्यापीठाची हाताळणी अर्थात नियंत्रण कोणी करायचे याबाबत संभ्रम होता मानव संसाधन विभागाने नियंत्रण करायचे कि कौशल्य विभागाने? असा तो संभ्रम होता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहानी याबाबतचे विधेयक मंजूर केले कौशल्य विद्यापीठ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे सिंबॉयसिसला त्यांची नक्की भेट घडवून आणू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले 

‘लोकसंखेच्या 65 टक्के लोक 35 वर्ष वयखालचे आहेत. त्याचे रूपांतर कौशल्याधारीत शिक्षणात झाले तर जागतिक अर्थव्यवस्था म्हणून आपण पुढे येऊ. ही संधी दुर्मिळ आहे. युरोप, कोरिया,चायना सारखी आपल्याला संधी आली आहे’, असे फडणवीस म्हणाले

‘पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यापीठ व कारखानदारी क्षेत्र एकत्र आल्यास प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. केवळ पुस्तकी ज्ञान नको तर प्रात्यक्षिक ज्ञानही यशाची गुरुकिल्ली आहे. भारताला कौशल्य विकासाची गरज असून, इतर खासगी विद्यापीठांसाठी सिंबॉयसिस आदर्श उदाहरण ठरेल’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ‘आणखी खासगी विद्यापीठे पुढे आल्यास सरकार त्यांना मदत करेल’, असेही त्यांनी सांगितले 

यावेळी प्रास्ताविक डॉ. स्वाती मुजुमदार यांनी केले. त्या म्हणाल्या की,‘विद्यार्थ्यांची उद्योग क्षेत्रातील भूमिका लक्षात घेऊन व विविध उद्योग समूहांच्या मदतीने अभ्यासक्रम बनवला आहे. परिवर्तनशील शिक्षणाचे विविध मार्ग, क्रेडिट बँकिंग, ट्रान्सफर, मल्टी एंट्री आणि एक्झिट या वैशिष्ट्यंमुळे हे विद्यापीठ पारंपरिक विद्यापीठांपेक्षा निराळे आहे.’ 

डॉ शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील हे पहिले कौशल्य विद्यापीठ आहे. मे 2017 मध्ये सिंबॉयसिस स्किल अँड ओपन युनिव्हर्सिटी राज्य विधान मंडळा अंतर्गत अधिनियमित झाले आहे. 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व अभियांत्रिकीच्या पदवी आणि 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे.’