Sat, Nov 17, 2018 16:42होमपेज › Pune › ‘इन्स्टाग्राम’वर कारचे ‘स्पिड’ दाखवणे जिवावर बेतले

‘इन्स्टाग्राम’वर कारचे ‘स्पिड’ दाखवणे जिवावर बेतले

Published On: May 15 2018 3:45PM | Last Updated: May 15 2018 3:45PMपिंपरी : प्रतिनिधी  

आपण किती भरधाव वेगात कार चालवतो हे मित्रांना ‘इन्स्टाग्राम’वर ‘लाइव्ह’ दाखवण्याच्या नादात एका तरूणाला प्राणाला मुकावे लागले आहे. रविवारी पहाटे पिंपरी ग्रेड सेप्रेटरमध्ये झालेल्या अपघातात हा प्रकार घडला असल्याचे तपासात पुढे आले आहे. 

शिवम हा आपला आतेभाऊ हृषिकेशसोबत कारने निघाला होता. पिंपरीच्या दिशेने जात असताना शिवम वेगात कार चालवत होता. आपण किती वेगात कार चालवत आहे, हे त्याला आपल्या मित्रांना दाखवायचं होतं. यासाठी त्याने ह्रषिकेशला आपला मोबाइल दिला आणि आपले स्‍पीड कार ड्रायव्हींग ‘इन्स्टाग्राम लाइव्ह’ करण्यास सांगितलं. यावेळी ह्रषिकेश मोबाइलवर शिवमच्या ड्रायव्हींगचे  ‘लाइव्ह’ करत असताना अचानक कारवरचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाउन आदळली. या अपघातात शिवमचा जागीच मृत्यू झाला, तर त्‍याच्या सोबत असणारा शिवमचा आतेभाऊ हृषिकेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलिस करत आहेत.