होमपेज › Pune › पिंपरी : सहायक पोलीस निरीक्षकाच्या घरात डल्ला

पिंपरी : सहायक पोलीस निरीक्षकाच्या घरात डल्ला

Published On: Feb 13 2018 5:09PM | Last Updated: Feb 13 2018 5:09PMपिंपरी : प्रतिनिधी

तूप विक्री करण्याचा बहाणा करून घरात घुसलेल्या दोघांनी नजर चुकवून सहा तोळ्याचे दागिने आणि ३० हजार रुपये लंपास केले. मुबंई येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या घरातच चोरट्याने डल्ला मारला.

कुसूम लालासाहेब झोडगे (वय ५८, रा. साई सोसायटी, संभाजीनगर, निगडी) या घरात एकट्या असताना चोरटे घरात तूप विक्री करण्यासाठी आले होते. झोडगे यांचा विश्वास संपादन करून, नजर चुकवून डब्यातील सहा तोळे दागिने आणि ३० हजार रूपये चोरून नेले. सहायक निरीक्षक मिलिंद झोडगे हे सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत. या घटनेचा तपास निगडी पोलिस करत आहेत.