Mon, Nov 12, 2018 23:22होमपेज › Pune › पिंपरीत तरुणाचा खून; कारमध्ये मृतदेह

पिंपरीत तरुणाचा खून; कारमध्ये मृतदेह

Published On: Mar 05 2018 12:34PM | Last Updated: Mar 05 2018 12:34PMपिंपरी : पुढारी ऑनलाईन

निगडी येथील भक्‍ती शक्‍ती चौकात एका कारमध्ये कुजलेल्या अवस्‍थेत तरुणाचा मृतदेह आढळला. दोन तीन दिवसांपूर्वी तरुणाचा खून झाला असल्याचा पोलिसांना संशय असून राहुल खुळे रा. सेक्‍टर २७ असे मृताचे नाव आहे. 

येथील कारमध्ये कुजलेल्या अवस्‍थेत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. मृताची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. मृत राहुल खुळे हा सेक्‍टर २७ येथील राहणारा असून त्याचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्‍पष्‍ट झाले नाही. याचा पोलिस शोध घेत आहेत.