Thu, Jun 27, 2019 11:42होमपेज › Pune › आयटी इंजिनिअर तरूणीचा विनयभंग

आयटी इंजिनिअर तरूणीचा विनयभंग

Published On: May 10 2018 5:25PM | Last Updated: May 10 2018 5:25PMपिंपरी : प्रतिनिधी

हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीस असलेली ‘इंजिनिअर’ तरूणी रात्री ऑफिसला जात होती. यावेळी ती चालत जात असताना, एका व्यक्‍तीने या तरूणीची छेड काढली. तसेच विनयभंग करण्याचा प्रयत्‍न केला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हिंजवडी येथे राहणार्‍या २५ वर्षीय इंजिनिअर तरूणीने फिर्याद दिलेली आहे. तर अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी बुधवारी रात्री कंपनीत कामासाठी निघाली होती. हिंजवडी येथील एमएसईबीच्या पॉवर हाउस येथील, परसिसंटस् कंपनीच्या समोरील कच्च्या रस्त्याने तरूणी निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरूणीची छेडछाड केली. तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तो निघून गेला. या अचानक घडलेल्‍या प्रकाराने धक्‍का बसलेल्‍या तरूणीने  या घटनेची हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.