Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Pune › भाजप महापौर राज ठाकरेंसमोर नतमस्तक

भाजप महापौर राज ठाकरेंसमोर नतमस्तक

Published On: Aug 10 2018 11:17PM | Last Updated: Aug 10 2018 11:17PMपिंपरी  : प्रतिनिधी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाजपचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी स्वागत केले. ठाकरे यांचासमोर ते नतमस्तक झाले.

राज ठाकरे हे पिंपळे सौदागर येथे एका व्यायाम शाळेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी महापौर जाधव यांनी राज ठाकरेंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला.

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश करुन राजकारणात प्रवेश केला होता. मनसेच्या तिकिटावर ते 2012 साली पालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच निवडून आले होते. 2017 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यंदा त्यांना महापौर होण्याचा मान मिळाला.

महापौरपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांनी जाधव यांनाच मत दिले होते. जाधव यांच्या मनात मनसेविषयी अजूनही प्रेम असल्याचं या निमित्ताने दिसून आले.