Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Pune › वंशाला दिवा पाहिजे असल्याने गर्भपात

वंशाला दिवा पाहिजे असल्याने गर्भपात

Published On: May 10 2018 8:56PM | Last Updated: May 10 2018 8:56PMपिंपरी : पहिली मुलगी झाल्याने निराध्या झालेला पती...वंशाला दिवा पाहिजे असल्याने मुलाची अपेक्षा...यातच दुसर्‍यावेळी पत्नी गर्भवती...याहीवेळी आपल्याला मुलगीच होईल ही शंका...मुलीचा भार नको डोक्याला म्हणून गर्भवती पत्नीच्या पोटात लाथा-बुक्यांनी मारहाण...या मारहाणीत चार महिन्याचा अर्भकाचा गर्भपात...गर्भपात करून मानसिक शारीरिक छळ करणार्‍या पती विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा...या मारहाणीत आणि धक्कादायक प्रकारामुळे  पीडित महिलेचे बिघडलेली मानसिक स्थिती...।
प्रकाश केंगार (32, रा बोपोडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तर विवाहितेचे वडील मोहन सिद्धराम जावीर (52, रा काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र पहिलीच मुलगी झाल्याने प्रकाश याने पत्नीचा छळ सुरु केला. सासरच्या मंडळींकडे मुलीच्या संभाळासाठी पैशाची मागणी केली. दरम्यान, पीडित महिला दुसर्‍यांदा गर्भवती राहिली. यावेळेसही मुलगीच होईल या शंकेने तो गर्भपात होण्यासाठी पोटावर लाथा बुक्यांनी सातत्याने मारहाण करुन पत्नीचा छळ करीत होता. या सततच्या मारहाणीच्या प्रकारामुळे अखेर ऑगस्ट 2017 मध्ये महिलेचा चार महिन्यांचा गर्भपात झाला. हा धक्का सहन न झाल्याने महिला मनोरुग्ण झालेली आहे. अर्जाद्वारे विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांकडे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणाची शहानिशा करत पोलिसांनी गुन्हा केला आहे. तपास वाकड पोलिस करत आहेत.