Fri, Apr 26, 2019 19:42होमपेज › Pune › चिंचवडमध्ये दुग्ध व्यावसायिकाचा संशयितरित्‍या मृत्यू 

चिंचवडमध्ये दुग्ध व्यावसायिकाचा संशयितरित्‍या मृत्यू 

Published On: Jun 22 2018 4:09PM | Last Updated: Jun 22 2018 4:09PMपिंपरी : प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन येथे शेजाऱ्यांशी किरकोळ झालेल्या वादानंतर एका दुग्ध व्यवसायिकाचा संशयितरित्‍या मृत्यू झाला आहे. संतोष बहिरवडे (वय ४०,रा.चिंचवड ) असे मृत्यू झालेल्या दुग्ध व्यावसायिकाचे नाव आहे. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

या प्रकरणी अजय पवार या शेजाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि अजय यांचा उसने पैसे घेण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. त्यातूनच आज सकाळी त्या दोघांमध्ये झटापट झाली. भांडणाच्या दोन तासानंतर संतोषचा मृत्यू झाला. संतोषच्या पत्नीने मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. मात्र संतोषच्या अंगावर मराहणीचे व्रण नाहीत त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.