Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Pune › गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाचा नगरसेवकांनी केला निषेध

गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाचा नगरसेवकांनी केला निषेध

Published On: Feb 05 2018 3:28PM | Last Updated: Feb 05 2018 3:28PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशव्दारावर 'कचरा फेको' आंदोलन केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने आपल्यावर दखलपात्र तर 'फ्लेक्स फेको' आंदोलन करणा-या भाजप नगरसेवकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करताना प्रशासन व सत्ताधारी भाजपने पक्षपतीपणा केला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या  नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने याचा  निषेध केला प्रशासन व सत्ताधारी पक्षाचा जाहीर निषेध असा मजकूर असलेला कुर्ता घालून व  डोक्याला काळीपट्टी बांधून  त्यांनी आपला निषेध नोंदवला.

शहरातील विविध प्रश्न मार्गी लागत नसल्याने विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही पालिकेसमोर आंदोलने करत आहेत मात्र गुन्हे दाखल करताना पक्षपतीपणा होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वार्ड क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर आणि म्हेत्रेवस्ती या परिसरातील  कचरा उचलला जात नव्हता. ठिकठिकाणी कच-याचे ढीगच्या-ढीग साचले होते. दुर्गंधी पसरून  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.  त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांनी 29 डिसेंबर 2017 रोजी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांसह 'कचरा फेको' आंदोलन केले  आंदोलन केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने नगरसेविका सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. 
दुसरीकडे पिंपळेनिलख, विशालनगर प्रभागातील अनधिकृत फ्लेक्स जाहिरातींवर कारवइची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी 16 जानेवारी रोजी पिंपरी महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर 'फ्लेक्स' फेकून आंदोलन केले. पालिका प्रशासनाने नगरसेवक कामठे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यात प्रशासनाने दुटप्पीपणा केला. असे नगरसेविका सोनवणे यांचे म्हणणे आहे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) घेण्यात आली होती. सभेचे निमित्त साधून पालिका प्रशासनाच्या दुट्टपीपणाचा  नगरसेविका सोनवणे यांनी निषेध केला. निषेधाचा मजकूर असलेला कुर्ता परिधान करुन त्या पालिकेत आल्या त्यांनी डोक्याला काळीपट्टी बांधली होती. डोक्यावर निषेध..निषेध....निषेध असे लिहिलेली टोपी  परिधान केली होती. नगरसेविका सोनवणे यांनी केलेल्या या अनोख्या निषेधाची चर्चा पालिका वर्तुळात होती