Wed, Jun 26, 2019 11:42होमपेज › Pune › भाजप नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन पक्षासाठी

भाजप नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन पक्षासाठी

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:25AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी पक्षासाठी एका महिन्याचे मानधन द्यावे, असे आदेश पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा निधी पक्ष कार्यालय आणि कार्यक्रमासाठी खर्च केला जाणार आहे. 

पक्षाच्या निधीसाठी ही रक्कम जमा केली जात आहे. त्याची जबाबदारी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे शहर भाजपला सुमारे साडेबारा लाख रुपये ‘पार्टी फंड’ म्हणून जमा होणार आहे. पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता भाजपने हस्तगत केली आहे. पालिकेत भाजपचे 77 नगरसेवक आणि स्वीकृत 3 असे एकूण 80 नगरसेवक  आहेत. अपक्ष 5 नगरसेवक भाजपला संलग्न आहेत.

त्या सर्व नगरसेवकांना पालिकेकडून निर्वाह भत्ता म्हणून दरमहा 15 हजार रुपये मिळतात. शहराध्यक्ष जगताप यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन पक्षाकडे फंड म्हणून जमा करण्याचे आदेश दिले आहेत.