Sat, Feb 16, 2019 15:44होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Published On: Jul 13 2018 2:41PM | Last Updated: Jul 13 2018 2:41PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्‍वाच्या प्रश्‍नांसंदर्भात पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शास्तीकर तसेच पवना बंद जलवाहिनी, आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी योजना आदींसह विविध महत्त्‍वाच्या प्रलंबित योजना व प्रकल्प राज्य शासनाच्या परवानगीअभावी अडकून पडले आहे. त्यांना राज्याच्या संबंधित विभागाकडून तातडीने परवानगी मिळावी म्हणून आयुक्त हर्डीकर मंगळवारी (दि.१०) रात्री तातडीने नागपूरला रवाना झाले. तेथे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 

आयुक्तांनी  दुसर्‍या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीष बापट व संबंधित मंत्री व अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. त्यामध्ये काही प्रश्‍न मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.