Wed, Nov 21, 2018 20:22होमपेज › Pune › दोन्ही कारभार्‍यांविरोधात भाजप निष्ठावंत एकवटले

दोन्ही कारभार्‍यांविरोधात भाजप निष्ठावंत एकवटले

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:51AMपिंपरी : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या दोन्ही आमदाराकडून भविष्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे क्षेत्रीय सदस्य निवडीद्वारे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निष्ठवंतांना गुरुवारी (दि.26)  होणार्‍या क्षेत्रीय सदस्य निवडीत ही कात्रजचा घाट दाखिविला जाणार ही भीती निर्माण झाली आहे. या भितीतून निष्ठावंत पुन्हा एकत्र होऊन ‘दोन वरिष्ठ’ पदाधिकारी त्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक ह्लचालीवर लक्ष असल्याने सर्व जुळवाजुळव ‘फोनाफोनी’वर सुरू आहे; त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांसह प्रदेशस्तरावर भेटीगाठी घेणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपाचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे पालिकेचे कारभारी असल्याने पालिकेत यांच्या शब्द प्रमाण मानला जातो. स्वताच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या अनुषंगाने निष्ठावंतांना बाजूला सारण्यात ते यशस्वी झाले आहेत. क्षेत्रीय सदस्याबरोबर बराच काळ रखडलेल्या महामंडळ निवडीसाठी भाजपामध्ये जोरदार हलचाली सुरू आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पिंपरीतील प्रदेश सदस्याच्या घरी बैठक झाली. त्यामध्ये कोणाला संधी द्यायची, कोणाचा पत्ता कट करायचा याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

 गुरुवारी (दि.26) आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रत्येकी तीन सदस्य भाजपकडून निवडण्यात येणार आहेत. त्याचे सर्वाधिकार आ. जगताप आणि आ. लांडगे यांच्याकडे आहेत असे समजते. त्यामुळे क्षेत्रीय सदस्य निवडीमध्ये निष्ठावंत गटाला एखादी दुसरी जागा मिळाली तर मिळेल अथवा नाही अशी श्यक्यता निर्माण झाली आहे. तीन्ही विधानसभा मतदारसंघात किमान आठ ते दहा सदस्यपदी  निष्ठावंत गटाला मिळाले पाहिजेत या अनुषंगाने प्रत्यत्न सुरू आहेत.  कोणाला ही वरचढ होऊन द्यायचे नाही म्हणून पक्ष पातळीवर गुप्त खलबते सुरू आहेत. याबाबत  निष्ठावंतांना अनभिज्ञ ठेवण्यात येत असल्याच्या चर्चेने क्षेत्रीय सदस्य निवडीमध्ये आयरामच बाजी मारणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपण एकत्र आलो नाही तर पक्षात फक्त सतरंज्या उचलाण्यापुर्तीच आपली किंमत राहील या भीतीने निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये ‘फोनफोनी’ला ऊत आला आहे. आपले हेवेदावे काहीही असोत आपण निष्ठावंत भाजप म्हणून एकत्रच राहिलो पाहिजे, या मतावर निष्ठावंत एकवटले आहेत. 

Tags : pimpri chinchwad, BJP,