Tue, Mar 19, 2019 21:00होमपेज › Pune › कॅश व्हॅन कर्मचार्‍यावर कोयत्‍याने वार करून २५ लाख पळवले

कॅश व्हॅन कर्मचार्‍यावर कोयत्‍याने वार करून २५ लाख पळवले

Published On: May 03 2018 5:25PM | Last Updated: May 03 2018 5:25PMपिंपरी : प्रतिनिधी 

निगडी, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमधील पैसे घेवून जात असताना कॅश व्हॅनच्या कर्मचार्‍यावर कोयत्याने वार करून त्याच्याकडील २५ लाख ५१ हजार रूपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. आज गुरूवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महेश पाटणे (रा. हडपसर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर भाऊसाहेब टकले (वय ३८, रा. म्हातोबानगर, कोथरूड) असे व्हॅनचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथील एलआयसी ऑफीसमध्ये पैसे घेण्यासाठी महेश पाटणे आणि चालक टकले हे (एमएच ०२, एक्सए ४६९९) व्हॅन घेवून आले होते. पैशाची बॅग व्हॅनमध्ये ठेवत असताना व्हॅन कर्मचारी पाटणे यांच्यावर तेथे आलेल्या चौघांनी कोयत्याने वार केले. त्यांना जखमी करून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून पळवून नेली. यामध्ये कॅशव्हॅन कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.