Sat, Sep 22, 2018 17:04



होमपेज › Pune › स्वाईन फ्लुने महिला दगावली

स्वाईन फ्लुने महिला दगावली

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 12:45AM



पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 18) स्वाईन फ्लुने एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर आणखी सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 12 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, तर एक रुग्ण व्हेंटिलेंटरवर आहे. 24 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या वर्षी दोन स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 17 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे या सूत्रांनी सांगितले. 

यंदाच्या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होती; मात्र सध्या बदलत्या वातावरणात त्यामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात सुमारे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यंदाच्या वर्षी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. यंदाच्या वर्षी अद्यापपर्यंत 3 हजार, 732 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. 18) 12 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकूण 91 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्यापर्यंत तीन लोकांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

या वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र वातावरणातील बदलाने स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढतच असल्याचे चित्र आहे. 16 ऑगस्ट रोजी या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी महिलेच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच दिवशी स्वाईन फ्लू झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. उपचार सुरू असताना संबंधीत महिलेचा मृत्यू झाला.