Fri, Nov 16, 2018 19:56होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचे तब्बल दहा पॉझिटिव्ह

स्वाइन फ्लूचे तब्बल दहा पॉझिटिव्ह

Published On: Sep 02 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 1:14AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 1) स्वाईन फ्लूचे तब्बल दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. या नव्या रुग्णांसह स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 60 वर पोचली आहे. तर शनिवारी 18 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. 9 लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये वाढती स्वाईन फ्लूची संख्या डोकेदुखी ठरत आहे. 

शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज पाच रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारी एका दिवसात 88 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यंदाच्या वर्षी अद्यापपर्यंत 4 हजार, 096 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. अद्यापपर्यंत एकूण 161 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 13 लोकांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले आहे.