Tue, Jun 18, 2019 22:48होमपेज › Pune › पिंपरी : सचिन साठे यांचा काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा 

पिंपरी : सचिन साठे यांचा काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा 

Published On: Jul 08 2018 4:43PM | Last Updated: Jul 08 2018 4:43PMपिंपरी : प्रतिनिधी

काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टिळक भवन ,दादर येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला .वयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र राज्यातले नेतृत्व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसला ताकद देत नसल्याच्या रागातून त्यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे 

मुंबईत आज काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे ,यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आपल्या व्यथाही बोलून दाखवल्याचे समजते. मात्र खर्गे यांनी हा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे साठे यांना सांगितले

वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत आहे मात्र शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे साठे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात साठे यांच्याशी सम्पर्क साधला असता ते म्हणाले की, माझी भूमिका मी वरिष्ठांस मोर मांडली. राजीनामा दिला राजीनामा देऊ नका असे खर्गे यांनी सांगितले पण मी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला आहे. 

 मात्र साठे हे वयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगत असले तरी पक्षाचे राज्य नेतृत्व पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांना पाठबळ देत नसल्याने ते अस्वस्थ असल्याचे समजते. विधानसभेला तसेच महापालिका निवडणुकीत राज्यातील नेतृत्वाने शहराला वाऱ्यावर सोडल्याचा राग त्यांच्या मनात असून त्यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे