Wed, Nov 21, 2018 13:33



होमपेज › Pune › पिंपरी : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या 

पिंपरी : आयटी अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या 

Published On: Aug 10 2018 7:25PM | Last Updated: Aug 10 2018 7:25PM



पिंपरी : प्रतिनिधी

हिंजवडी आयटी कंपनीतील एका संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे सकाळी उघडकीस आली.

अभिजित रामदास मुळे (३८, रा. गिरिराज हाउसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड. मूळ गाव कळंब, उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्यांचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे संगणक अभियंता असून, हिंजवडीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत. आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास लावून घेतला. याबाबत माहिती मिळताच, चिंचवड पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी अभिजित यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.