Mon, Nov 19, 2018 19:51होमपेज › Pune › स्वाइन फ्लूचे चार पॉझिटिव्ह

स्वाइन फ्लूचे चार पॉझिटिव्ह

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 1:34AMपिंपरी :

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 31) पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 50वर पोहोचली आहे. मंगळवारी 11 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहेत. 27 संशयितांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या वर्षी पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.  यंदाच्या वर्षी अद्यापपर्यंत 4 हजार 8 जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. अद्यापपर्यंत एकूण 143 जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 13 लोकांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.