Tue, Jul 23, 2019 10:48होमपेज › Pune › इराणी टोळीकडून ४५ तोळे दागिने जप्त

इराणी टोळीकडून ४५ तोळे दागिने जप्त

Published On: Feb 09 2018 5:16PM | Last Updated: Feb 09 2018 5:16PMपिंपरी : प्रतिनिधी

वाकड, हिंजवडी आणि चतुरशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातलेल्या इराणी टोळीच्या मुसक्या आवळण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. यातील तीन चोरट्यांना पकडून तबबल ४५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

हेदर अक्रम जाफरी (वय २८), जोहेब कादिररूल हसन सयद (३१) आणि जसीमुद्दीन हयातअली शेख (२०, रा. सर्व अंबवली, ठाणे) या तिघांना अटक केली आहे. यांच्याकडून १३ लाख ५३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८, हिंजवडीतील ५ आणि चतुरशृंगीमधील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. हेदर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सोनसाखळी हिसकावल्याचे ८ गुन्हे दाखल आहेत. तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, जावेद पठाण, विवेकानंद सपकाळे, धनराज किरनाळे, श्याम बाबा, नितीन गेंगजे यांनी मुख्य मास्टर माइंड हेदर याला अटक केली.