Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Pune › आगीत होरपळून महिलेचा मृत्यू

आगीत होरपळून महिलेचा मृत्यू

Published On: Apr 10 2018 6:46PM | Last Updated: Apr 11 2018 1:07AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी भाटनगर येथे दहा वाय बाराच्या खोलीत लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. हा  प्रकार आंबेडकर कॉलनीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला. महिलेने स्वतः पेटवून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तवला आहे, यास अग्निशामक दलाच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.

गीता जगताप (55, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. गीता जगताप आंबेडकर कॉलनीमध्ये पहिल्या मजल्यावर राहतात. मंगळवारी सायंकाळी आग लागल्याने त्यामध्ये होपरळून त्यांचा मृत्यू अग्निशामक दलाचे जवानांनी पाण्याचा फोवारा मारुन आग अटोक्यात आणली. मात्र तो प्रयत्न गीता यांचा मृत्यू झाला होता. 

तसेच घर जळून खाक झाले होते.आंबेडकर कॉलनीमध्ये गीता या दहा बाय बाराच्या खोलीत राहत होत्या. एका खोलीत खाली स्वयंपाक खोली आणि वरती जिनाकरुन लाकडाचे विभाजन केले होते. गीता यांची सुन माहेरी गेली होती. तर दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर गेली होती. घरात एकट्या असताना महिलेने स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये होरपळून मृत्यू झाला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.