होमपेज › Pune › निगडीत टोळी युद्ध भडकले, गोळीबारात 2 जखमी

निगडीत टोळी युद्ध भडकले, गोळीबारात 2 जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

रावणसेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळी प्रमुख सोन्या काळभोर गाडीत असल्याचे समजून गाडीवर गोळीबार करण्यात आला.  गोळ्या गाडीवर लागल्याने जखमी कोणी झाले नाही. मात्र, यामध्ये सोन्या काळभोरचे दोन साथीदार जखमी असल्याची चर्चा सुरू होती. रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात आलेले नव्हते. हा प्रकार निगडी आणि देहूरोडच्या हद्दीलगत रविवारी रात्रीच्या सुमारास घडला असल्याचे बोलले जात आहे. 

अमित फार्निस आणि जीवन सातपुते हे दोघे जखमी झाले असल्याची चर्चा आहे.  सोन्या काळभोर हा या हल्ल्यातून बचावला असल्याचे सांगण्यात येत आहे.