Wed, Nov 14, 2018 14:21होमपेज › Pune › पिंपरीचे नियोजित महापौर आले महात्मा फुले यांच्या वेशात!

पिंपरीचे नियोजित महापौर महात्मा फुलेंच्या वेशात

Published On: Aug 04 2018 11:29AM | Last Updated: Aug 04 2018 11:45AMपिंपरी प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड शहराचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला आहे. वेगळा वेश परिधान करुन नियोजित महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

महापौर व उपमहापौरांची आज (शनिवारी)सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे. महासभेला येताना नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आले आहेत.

गेल्याच महिन्यात पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला पगडी वरुन चांगलेच राजकारण तापले होते. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमधील महानगरपालिकेच्या महापौर निवडीतही हा मुद्दा गाजणार असे दिसते.